जळगाव- तालुक्यातील नागझिरी शिवारातील गिरणा नदीच्या काठावर असलेल्या वीज तारांचा धक्का लागून शांताराम प्यारेलाल मोरे (वय-३२, रा़ मोहाडी) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११़.१५ वाजेच्या सुमारास घडली़ घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह मित्रमंडळीची जिल्हा रूग्णालयात एकच गर्दी झाली होती़ या घटनेमुळे मोहाडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मोहाडी येथील शांताराम मोरे यांच्यासह नारायण सोनवणे, यशवंत सोनवणे, प्रशांत कोळी तसेच प्रवीण मोरे हे सकाळी १० वाजेच्या सुमारास नागझिरी शिवारातील गिरणानदी पात्रात पोहण्यासाठी आले होते़ नदी पात्राच्या एका काठावर ग्रामपंचायतीची एक विहिर आहे़ विहिरीतून पाणी पुरवठा करण्यासाठी मोटार अर्थात मशिन बसविण्यात आली आहे़ या मशिनीच्या वायरी ह्या नदीपात्राच्या काठावरून गेल्या आहेत़ शांताराम मोरे हे पोहत-पोहत नदीच्या अलीकडच्या काठावर गेले़ काठावर येताच कपडे काढत असताना त्यांचा अचानक पाय मशिनीच्या वायरीवर पडला़ अन् त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि ते खाली कोसळले़ मित्रांनी शांताराम यास त्वरीत रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात नेले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती शांताराम यास मृत घोषित केले़
विजेच्या धक्क्याने मोहाडीच्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 7:58 PM
जळगाव- तालुक्यातील नागझिरी शिवारातील गिरणा नदीच्या काठावर असलेल्या वीज तारांचा धक्का लागून शांताराम प्यारेलाल मोरे (वय-३२, रा़ मोहाडी) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली़
ठळक मुद्देनागझिरी शिवारातील घटनापोहण्यासाठी गेले असता घडली घटनाजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी