शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नाशिक येथील एकाची फाशीच्या शिक्षेतून मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:31 PM

अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी केला युक्तीवाद

जळगाव: नाशिक येथील पल्लवी संसारे व विशाल संसारे या माय-लेकाच्या खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी रामदास शिंदे याची मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी फाशीच्या शिक्षेतून निर्दोष मुक्तता केली आहे़ अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तीवाद केला.सन २०१६ च्या एप्रिल महिन्यात पल्लवी संसारे (३४) व त्यांचा मुलगा विशाल (६) यांचा धार-दार शस्त्राने खून करण्यात आला़याप्रकरणी मयत पल्लवी यांचे पती कचरू संसारे यांच्या फिर्यादीवरून रामदास शिंदे याच्याविरूध्द सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़नाशिक जिल्हा आणि सत्र नायालयात खटला चालला. यात न्यायालयाने आरोपी रामदास शिंदे याला २६ एप्रिल २०१८ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती.शिंदे याने मुंबई उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड़ अनिकेत निकम यांच्यामार्फत न्यायालयाच्या या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.अ‍ॅड़ निकम यांनी आरोपीला फाशी ठोठावण्या इतपत कोणताच पुरावा न्यायालय पुढे नाही, एवढेच नव्हे तर संपूर्ण खटल्यात कोणताच प्रथम दर्शनी साक्षीदार नसून संपूर्ण केस ही परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारीत आहे.परिस्थिजन्य पुराव्याची सबळ साखळी सरकारी वकिलांनी कोर्टात मांडली नाही आणि अश्या परिस्थितीत शिंदे याला फाशीची शिक्षा देणे चुकीचे असून त्यांची सदोष मुक्तता करण्यात यावी, असे न्यायालयात पटवून दिले़रिकव्हरी पंचनाम्यात चाकूवर रक्त असल्याचे उल्लेख नाही़ परंतु रासायनिक विश्लेषण अहवालात चाकूवर रक्त आहे असे नमूद करण्यात आले त्यामुळे पुराव्याशी छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निकम यांनी पटवून दिले़त्यानंतर सरकार पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला़ दोन्ही पक्षांकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्य खंडपीठाचे न्यायमूर्ती बी़पी़धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी शिदे याची फाशीच्या शिक्षेतून निर्दोष मुक्तता केली आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव