जळगाव : सुशीलाबाई बोदडे (७२, रा.मेहरूण) यांचे बुधवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रकाश यांच्या आई होत.
सिंधुबाई कासार
जळगाव : सिंधुबाई कासार (दोडे) (७५, रा.गोपाळपुरा) यांचे यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, नात असा परिवार आहे.
सुनील तायडे
जळगाव : सुनील तायडे (५२, रा.बीएसएनएल क्वार्टर) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, सून असा परिवार आहे. मोहन तायडे यांचे ते बंधू होत.
भगवान पाटील
जळगाव : भगवान पाटील (८५,रा.खेडी बु.) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विलास पाटील यांचे ते वडील होत.