जळगाव : गेल्या २४ तासात जिल्ह्यातील यावल, धरणगाव आणि सावदा, ता. रावेर येथील तीन कोरोनाग्रस्त महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.धरणगावची महिला ६५ वर्षीयधरणगाव येथील नवेगाव परिसरातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या ६५ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याने शहर सुन्न झाले आहे. शहरात एकूण १० जण बाधित होते. पैकी पहिली बाधित निघालेली ही महिला गेल्या चार दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होती. अखेर तिच्या मृत्यू झाल्याने शहरात खळबळ माजली आहे.यावल येथील महिला ५८ वर्षीययावल येथील पूर्णवाद नगरातील कोरोनाग्रस्त ५८ वर्षीय महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला. १६ रोजी तिचे स्वॅब घेतले होते.सावद्याची महिला ७० वर्षीयसावदा येथील पोलीस स्टेशन नाक्याजवळील कोरोना बाधित ७० वर्षीय महिलेचा बुधवारी रात्री जळगाव येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. सावदा येथे आतापर्यंत कारोना बाधित दोन रुग्ण आहे. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या वार्तेने गावात खळबळ उडाली आहे. या महिलेचा अत्यंविधी जळगाव येथेच करण्यात आला. या महिलेचे पती व मुलास सावदा येथे आधीच क्वारंटाईन केले आहे.
तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:01 PM