शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

छातीत लाथ मारल्याने तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:02 PM

रामेश्वर कॉलनीतील घटना

जळगाव : लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये रहाणाऱ्या मद्यपी तरूणाने लाडाने जवळ आलेल्या तीन वर्षाच्या बालकाच्या छातीत लाथ मारल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजता रामेश्वर कॉलनीतील यशोदा नगरात घडली. महेश अशोक जाधव असे मयत बालकाचे नाव आहे.दरम्यान, या घटनेत बालकाला जिल्हा रुग्णालयात सोडून संशयिताने पलायन केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कैलास अशोक माळी (३४, रा.शेंदुर्णी, ता. जामनेर) याच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कैलास माळी व आशाबाई हे आशाबाईचा मुलगा महेश व तीन मुलींसह रामेश्वर कॉलनीतील यशोदा नगरात भाड्याच्या घरात लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सोमवारी दुपारी दोन वाजता कैलास घरी आला असता महेश हा त्याच्याजवळ लाडाने आला. तेव्हा त्याच्या शर्टाला पेनची शाई लागलेली दिसली. त्याबाबत कैलास याने महेशला विचारले, मात्र त्यात तो काहीही बोलला नाही. लाडाने जवळच थांबल्याने कैलास याने महेश याच्या छातीत लाथ मारली. त्यात तो लांब फेकला गेला व झटके द्यायला लागला.रस्त्यातच सोडले प्राणतोंडातून फेस व झटके येत असल्याने घाबरलेल्या कैलास याने आशा व शेजारच्या महिलांच्या मदतीने महेश याला दुचाकीवरुन रामेश्वर कॉलनीतील खासगी दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रस्त्याने आणतानाच तो जास्तीचे झटके देत होता. काही अंतरावरच त्याने प्राण सोडले. रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव