सक्रिय रुग्ण ६ हजार पार
जळगाव : जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ही ६२४८ वर पोहोचली आहे. एकूण ६७६८० रुग्णांपैकी ६०००५ रुग्ण बरे झाले असून १४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत. यासह चोपडा, चाळीसगावात सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. काही नवे हॉटस्पॉट समोर येत आहे.
अपघाताचा धोका
जळगाव : अजिंठा चौफुलीवर औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगदी मधोमध मोठा खड्डा पडला आहे. काही दिवसांपूर्वी तो तात्पुरता बुजण्यात आला होता. मात्र, काही प्रमाणात हा खड्डा पुन्हा उघडा पडला असून यामुळे मोठ्या अपघाताची भीती या ठिकाणी वर्तविली जात आहे.
ग्रामीण भागात नो मास्क
जळगाव: शहरी भागात मास्क वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक असले तरी ग्रामीण भागात मात्र, ग्रामस्थ एकत्रित वावरताना मास्कचा वापरच करीत नसल्याचे गंभीर चित्र कायम आहे. कोरोनाने ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असून ग्रामस्थांची ही बेफीकीरी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरू शकते.