लोकमत ऑनलाईन पातोंडा, ता.अमळनेर, दि.5 : शाळा सुटल्यानंतर विद्याथ्र्याना घरी सोडण्यास आलेल्या रिक्षाच्या फाटकाचा धक्का लागून येथील महिला सरपंचाचा तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवार, दि.5 रोजी दुपारी घडली. यामुळे तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. पुनीत विनोद पवार असे मृत बालकाचे नाव असून तो सरपंच शीतल पवार यांचा मुलगा होता. पातोंडा येथील इंग्लिश मेडीयम स्कूलमधील प्ले गृप या वर्गात शिकणारा तीन वर्षीय पुनीत हा रोजच्या प्रमाणे गुरुवारी गावाजवळच असलेल्या इंग्लिश मेडीयम शाळेत तीन चाकी रिक्षातून शाळेत गेला होता. दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्याथ्र्याना 12.15 वाजता घेऊन आलेल्या रिक्षाचालकाने पुनित पवारच्या घराच्या समोरील कमलाकर मुठे यांच्या अंगणात रिक्षा थांबविली. यावेळी पुनित हा देखील रिक्षातून खाली उतरला. परंतु त्याला रिक्षाच्या उघडय़ा असलेल्या फाटकाचा धक्का लागल्याने तो खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेमुळे गावात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
रिक्षाच्या फाटकाचा धक्का लागून महिला सरपंचाच्या मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 11:47 PM
अमळेनर तालुक्यातील पातोंडा येथील शाळेतून घरी परतणा:या चिमुकल्या विद्याथ्र्याच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देअंगणात थांबलेल्या रिक्षातून चिमुकला उतरल्यानंतर घडली दुर्घटनाफाटकाचा धक्का लागून पडल्याने मेंदुला बसला जबर मार