पहूर, ता. जामनेर: पिंपळगाव खुर्द येथील शिवाजी राजू पाटील (२५)हा युवक रोटाव्हिटर टँक्टर चालविताना खाली पडल्याने गंभीर जखमी झाला होता. शुक्रवारी जळगाव येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.प्राप्त माहिती नुसार शिवाजी राजु पाटील याने प्रतिकूल परिस्थितीत नुकतेच नवीन ट्रॅक्टर वरोटाव्हिटर खरेदी केले होते. बुधवारी पिंपळगाव बुद्रुक शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात मशागतीसाठी शिवाजी पाटील गेला होता. रोटाव्हीटर चालवित असताना अचानक खाली पडल्याने गंभीर जखमी झाला.गावातील काही युवकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवाजी याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्याच्यावर काळाने झडप घातली . घरचा कर्ता व तरुण मुलगा गेल्याने परीवार उघड्यावर आला आहे. त्याच्या पश्चात एक तान्हुले बाळ,पत्नी,आई -वडील असा परीवार आहे.पंधरा दिवसाचे बाळवडिलाच्या प्रेमाला मुकलेशिवाजी पाटील याचा विवाह गेल्या वर्षी झाला. त्यांना पंधरा दिवासाचे तान्हुले बाळ असून या तान्हुल्याला आपले विश्व कसे याची कल्पना नाही. अशा परीस्थितीत बाळाचे पित्रुछत्र हरपल्याने बाळ पित्याच्या प्रेमाला कायमचे मुकले आहे.
रोटोव्हीटर वरून पडल्याने जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 9:16 PM