जळगाव : महापालिकेत बुधवारी १४ लिपीकांच्या बदल्या केल्यानंतर मनपातील सामान्य प्रशासन विभाग व महसूल विभागात वादाची ठिणगी पडली आहे. प्रभाग समिती एक मधील ५ जणांची बदली केल्यामुळे विभाग प्रमुखांसह उपायुक्तांनीही नाराजी व्यक्त केली तसेच बदली रद्द करण्याची मागणी उपायुक्त गुट्टे यांनी केली आहे. मात्र, आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी कोणत्याही परिस्थितीत बदली रद्द करण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे.सर्व बदल्या या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांच्या आदेशानुसार झाले आहेत. त्यांच्या निर्णयालाच महसूलच्या उपायुक्तांनी आव्हान दिल्यामुळे हे दोन्ही विभाग आमने-सामने आले आहेत.लिपीक म्हणून जे कर्मचारी काम करत असतात, त्यांना कोणत्याही विभागात काम करावेच लागते. तसेच जे कर्मचारी काही वर्षांपासून एकाच विभागात काम करतात त्यांना इतर विभागाचा कामकाजाचा अनुभव घेता यावा यासाठी या बदल्या केल्या जातात. त्यामुळे बदली केली म्हणून कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.
बदल्यांवरून वादाची ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:56 PM