पाचोरा : तालुक्यातील खडकदेवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाचे पाणी पाटचारीत वाहत जावून मोठय़ा प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. तीन वेळा कालव्याने पाणी सोडण्यात आले मात्र पाटचा:यात स्वच्छता नसल्याने पाणी वळण सोडून वाहत आहे. याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकाराकडे संबंधित अधिका:यांचे दुर्लक्ष होत असल्याने हिवरा पट्टय़ात भविष्यात पाणीटंचाईचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. हिवरा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. तसे उजव्या कालव्याचे पाणी आव्रे केटीवेअर्पयत सोडण्यात आले आहे. मात्र हे नियमबाहय़ पाणी कोणत्या आदेशाने सोडले याचा खुलासा होऊ शकला नाही. पाण्याची नासाडी लवकर थांबविण्यासाठी पाऊले ऊचलली जावीत तसेच वरिष्ठांनी दखल घेऊन पाणी चोरी करण्यास प्रवृत्त संबंधित अभियंत्याची चौकशी करून कारवाई करावी अशी आम आदमीची मागणी आहे. दरम्यान हिवरा नदीवरील केटीवेअरमध्ये पाणी कसे सोडले? असा प्रश्न उपस्थित होत असून परवानगीधारकांसाठी पाणी उपसा करण्याची मुदत 28 फेब्रुवारी रोजी संपत असल्याने नंतर पाणी उपसा तात्काळ रोखावा अन्यथा तीव्र पाणीटंचाई जाणवेल अशी भीती व्यक्त होत आहे. तर पाणी नासाडी प्रकरणी प्रकरणी संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी आहे. दरम्यान शाखा अभियंता एस. पी. मोरे यांनी पाणी चोरी झाली तसेच पाणी वाया जात असले तरी कमी कर्मचारी असल्याने कार्यवाही करणे कठीण होत असल्याचे सांगून कानावर हात ठेवले. (वार्ताहर)नदीजोड प्रकल्पांतर्गत 15 फूट खोल पाट खोदला आहे. परंतु त्याचे काम 10 वर्षापासून रखडले आहे. या पाटालादेखील चोरुन पाणी सोडल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच मोंढाळा रोडवरील पाटचा:या उथळ असल्याने त्यांची सफाई न करता वरवर काम केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहहे. यामुळेच पाणी अस्ताव्यस्त वाहत जाऊन प्रचंड नासाडी झाली. 100 टक्के प्रकल्प भरलेला होता आता 25 टक्के जलसाठा शिल्लक आहे
हिवरा प्रकल्पातील पाण्याची नासाडी
By admin | Published: March 01, 2017 12:17 AM