कासोदा- जिल्ह्यात जे शेतकरी मृत झाले आहेत, ते शासनाने कर्जमाफी देऊन देखील आजतागायत कर्जमुक्त झालेले नाहीत. पालकमंत्र्यांकडे हा विषय मांडण्यात आल्यानंतर देखील ही फाईल मात्र या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरत असून कर्जमाफी मात्र होत नसल्याने मयतांचे वारस शासनाच्या मदतीपासून वंचीत आहेत. त्यांना नव्याने कर्ज देखील मिळत नसल्याने ऐन खरीपात त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून अनेक शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला. नव्याने कर्ज देखील मिळाले आहे. परंतू जिल्हाभरात जे शेतकरी मृत झाले आहेत,त्या शेतकºयांना मात्र कर्जमाफी मात्र झालेली नाही. त्यांच्या वारसांना मात्र कर्ज असल्याने विकासंस्थेत सभासद होता येत नाही की नव्याने कर्ज मिळत नसल्याने खरीपाच्या हंगामात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकट्या कासोद्यात कर्ज घेतलेल्या मयत शेतकºयांची संख्या ५६ एवढी आहे. ही संख्या तालुका व जिल्ह्याचा विचार करता मोठी आहे. परंतू हे सर्व शेतकरी कर्जमाफी होण्याची वाट पहात आहेत.हा प्रश्न कासोद्यातील शेतकºयांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कासोदा दौºयावर आले असता त्यांच्याकडे मांडल्यावर त्यांनी लागलीच जळगाव येथील निबंधकांना हा प्रश्न आजच्या आज तातडीने निकाली काढा असे बजावले होते. त्यानंतर तातडीने चक्र फिरली, एरंडोलच्या सहाय्यक निबंधकांनी कासोदा विकासंस्थेत संपर्क करुन तातडीने अशा शेतकºयांची यादी मागवली. विकासंस्थेने या यादीत कर्जाचे आकडे तसेच मयतांचे नाव, वारसाचे नाव, वारसाचे बँक खाते इत्यादी आवश्यक माहिती या कार्यालयाकडे पाठवली. आता ही यादी जिल्हा बँकेकडे पाठवण्यात आली आहे, मात्र त्यावर कधी कार्यवाही होते, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागून आहे.जिल्हा बँकेचे अनेक संचालक आमदार व खासदार आहेत, जिल्हा बँकेने या प्रश्नी तातडीने निर्णय घ्यावा, ही अपेक्षा आहे. कारण यामुळे बँकेचाच जास्त फायदा आहे. यामुळे बँकेचा एनपीए कमी होण्यासाठी मदत होणार आहे. शेतकºयांच्या वारसांनापण मदत होणार आहे.- दीपक वाणी, चेअरमन विकासंस्था कासोदासंस्थेकडून यादी मिळाली आहे. हा फक्त कासोद्याचा विषय नसून जिल्हाभरातील मयत शेतकºयांचा आहे. लवकरच याबाबत बैठक होऊन तातडीने यावर कार्यवाही होईल.-सुभाष पाटील, विभागीय व्यवस्थापक जिल्हा बँक.