ठळक मुद्देस्वतःच्या शेतात विष पिऊन संपवले जीवन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यातील डांगरी येथील आधार किसन कोळी (६५) या कर्जबाजारी शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना २ रोजी पहाटे घडली.
आधार कोळी यांची डांगरी येथे ५ बिघे शेती असून त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँक पीक कर्ज व खाजगी कर्ज आहे. शेतीत उत्पन्न आले नाही आणि बँकेचे कर्ज फेडू शकले नाहीत, म्हणून त्यांनी शेतातच विषारी द्रव्य प्रश्न करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. किसन कोळी यांच्या खबरीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.