आयुध निर्माणी कामगार युनियन एवम् संयुक्त कृती समितीने पत्राद्वारे महाप्रबंधक यांना निर्माणी रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यासाठी निवेदन दिले होते. वारंवार निवेदन देऊनही आतापर्यंत बाकी राहिलेल्या ४५ वर्षांवरील दुसरा डोस व १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी प्रशासनाने निर्णय घेतला नाही.
स्थानिक वरणगाव निर्माणीमध्ये लसीकरण सुरू आहे; परंतु आयुध निर्माणी भुसावल प्रशासन लसीकरणास प्राधान्य देत नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.
निर्माणीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सॅनिटायझेशन होत नाही. सकाळी व संध्याकाळी पंचिंग करतेवेळी गर्दी होत आहे. इतर निर्माणीत कोविडमुळे पंचिंग बंद आहे. कामगार युनियनने जिल्हा प्रशासन एवम् कोलकाता बोर्ड व संरक्षण मंत्रालयाला निवेदन दिले आहे. लसीकरण व्यवस्था करण्याची मागणी अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघ-ए.आय.डी.ई.एफ.चे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र झा यांनी केली आहे.