शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
3
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
4
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
5
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
6
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
7
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
8
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
10
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
11
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
12
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
13
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
14
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
15
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
16
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
17
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
18
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
19
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
20
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?

मुक्ताईनगरात लॉकडाऊन अतिशय सक्तीने करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 4:46 PM

आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाची बैठक घेत निर्बंध अतिशय क डक करून लॉकडाऊनलोड सक्तीने पालन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देमुक्ताईनगर येथे आमदारांनी घेतली प्रशासनाची बैठकआठवड्यातून तीनच दिवस व्यवहार सुरू ठेवण्यासंदर्भात विचार

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्याच्या सभोवताली असलेल्या तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने मुक्ताईनगरमध्ये शिरकाव होऊ नये म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाची बैठक घेत निर्बंध अतिशय क डक करून लॉकडाऊनलोड सक्तीने पालन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.याप्रसंगी तहसीलदार श्याम वाडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विक्रांत जगदाळे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, गटविकास अधिकारी संजय बैरागी तसेच तालुक्यातील अंन्य अधिकारी यांच्यासह अ‍ॅड. मनोहर खैरनार, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, दीपक पवार, संतोष कोळी आदी उपस्थित होते.तालुक्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी यापुढे सोमवार ते बुधवार हे तीन दिवस व्यापारी वर्ग आणि मजूर सर्वसामान्य ग्रामीण लोकांना महत्वाचे म्हणून गुरुवार नंतरचे दिवस बंद ठेवण्यास हरकत नाही, अशा सूचना आमदार पाटील यांनी दिल्या.केळी वाहतुकीस आवश्यक तितकीच मुभा देवून दक्षतेच्या संदर्भात मध्यप्रदेशातील वारोळी, नाचणखेड़ा गावांकडील सीमा सक्तीने बंद ठेवण्याच्या सूचना पुन्हा दिल्या. दुकानदार आणि दुध विक्रेत्यांनी ग्राहक मास्क लावले नसेल तर माल वस्तू ग्राहकाला देउ नये. तसे असल्यास दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. हे सर्व करताना ग्रामीण ग्राहक नागरीकांसाठी संध्याकाळची कामावरुन परत येण्याची वेळ सोइची म्हणून वाढवून देण्यासाठी मुभा देण्याचे ठरले. गुरुवार ते शनिवार दरम्यान भाजी पाला मार्केट हे सक्तीने बन्द ठेवल्यास कोरोनाची साकळी मोडण्यास सोयीची ठरेल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.राणे यांनी सांगितले.ग्राहकांनी शारीरिक अंतर न पाळल्यास व ग्राहक आखलेल्या बॉक्सच्या बाहेर दिसल्यास दुकानदारवर कारवाई करण्यात यावी. दुकानांच्या गर्दीचे नियमन करण्यासाठी नगर पंचायतीने कसोशीने प्रयत्न करा. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांनी दर सोमवारी गावात सामाईक सभा घेतलीच पाहिजे, असे ठरविण्यात आले. आराखडा व टारगेट मोडणारांवर कडक कारवाईबाबत आधी नोटीसा देण्यात याव्या. घोळक्याने दिसणारांवर कारवाई करण्यात यावी. मास्कची सक्ती पुरुषाबरोबर महिलांवरही करा, अशा सूचना व चर्चा करण्यात आली. दुकानांच्या लेखी जागा नोंदी ठेवा. जेणेकरून दुकानांची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर