लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील नगरपालिकेबाबत या महिन्याच्या अखेरीस अधिसूचना निघणार असल्याची माहिती देत येथील पहिला नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल, असा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते नशिराबाद येथे युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.
नशिराबाद नगरपालिकेचा जिल्हा परिषदेकडचा अहवाल बाकी असून, आपण तो उद्या मंत्रालयात घेऊन जात आहोत. यामुळे या महिन्याच्या अखेरीस नशिराबादला नगरपालिका होणार असल्याचे निश्चित आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, नशिराबाद ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार केली असून, याची योग्य ती चौकशी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, तालुका प्रमुख राजू चव्हाण, शहरप्रमुख विकास धनगर, युवासेना शहरप्रमुख चेतन बर्हाटे, संगायो सदस्य चंदू भोळे, कैलास नेरकर, संघटक आबा माळी, नितीन बेंडवाल, नितीन भोई, मोहन कोलते, दीपक बोंडे, महेंद्र कोळी, विशाल सोनवणे, मयूर झटके, दीपक सपकाळे, संजय देशमुख, सोहन पाटील, सोपान कोळी, राज बेंडवाल, मनोज नाथ, दर्शन झटके, प्रकाश कनगरे, दिनेश सावळे, नीलेश धनगर, आदी उपस्थित होते.