जळगाव : आगामी महापालिका निवडणुकीत खाविआ व भाजपा युतीसंदर्भात आठवडाभरात माजी मंत्री सुरेशदादा यांची भेट घेणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. शनिवारीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समविचारी पक्षाशी युती करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यामुळे इच्छुकांच्या नजरा आता गिरीश महाजन व सुरेशदादा जैन यांच्या भेटीकडे लागल्या आहेत.मे महिन्यात युतीची बैठक होण्याची शक्यता होती. मात्र, पालघर मतदारसंघाची लोकसभा पोटनिवडणूक व विधानपरिषदेच्या निवडणुकांमुळे ही बैठक होवू शकली नव्हती. मात्र, आता आठवड्यात सुरेशदादा जैन यांची भेट घेणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. जळगावलाच ही भेट घेणार असून, आमच्या बैठकीत ठरलेल्या मुद्यांबाबत नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली जाईल असेही महाजन यांनी सांगितले.
जळगाव मनपातील युतीबाबत आठवडाभरात निर्णय : गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:30 PM
जळगाव महापालिका निवडणुकीत खाविआ व भाजपा युतीसंदर्भात आठवडाभरात माजी मंत्री सुरेशदादा यांची भेट घेणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. शनिवारीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समविचारी पक्षाशी युती करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यामुळे इच्छुकांच्या नजरा आता गिरीश महाजन व सुरेशदादा जैन यांच्या भेटीकडे लागल्या आहेत.
ठळक मुद्देयुती संदर्भात माजी मंत्री सुरेशदादा यांची भेट घेणारपालकमंत्र्यांनी केली समविचारी पक्षाशी युती करण्याची घोषणाइच्छुकांच्या नजरा आता दोघांच्या भेटीकडे