रावेर, जि.जळगाव : खान्देशची जीवनसरीता तथा ताप व पापनाशिनी असलेल्या सूर्यकन्या तापामाईचा जन्मोत्सव सोहळा मध्य प्रदेशातून खान्देशात सीमोल्लंघन करत असलेल्या तथा राजा दशरथांचे आजोबा असलेल्या अजनाब ऋषींची अजनाड तपोभूूमी असलेल्या भभूती टेकडीच्या पायथ्याशी शनिवारी आषाढ वद्य सप्तमीला कोरोनाच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही १८ वर्षांची अखंड परंपरा अव्याहतपणे कायम ठेवत भावभक्तीने साजरा करण्यात आला.सध्या कोरोनाच्या अनलॉकमध्ये सोशल डिस्टन्सिंग कायम राखण्यासाठी गर्दी जमा होईल, अशा धार्मिक कार्यक्रमांवरही बंधने आली. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अजनाड येथील श्री तापी जन्मोत्सव सोहळ्याचे संयोजक तथा प्रगतीशील शेतकरी विनायक श्यामू महाजन व परिवाराने हा तापीमाईचा जन्मोत्सव सोहळा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कुठलाही खंड न पडू देता प्रातिनिधिक स्वरूपात तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी साजरा करण्याचा निर्णय घेतला.त्या अनुषंगाने प्रगतशील शेतकरी विनायक महाजन यांचे पुतणे दीपक व कीर्ती महाजन यांच्याहस्ते सपत्नीक वैदीक मंत्रघोषात तापीमातेची महापूूजा, महाभिषेक व महाआरती करून तथा साडी व खणा नारळाची ओटी सर्ू्यकन्या तापी नदीपात्रात समर्पित करून कृतज्ञतापूर्वक हा जन्मोत्सव सोहळा भावभक्तीने साजरा करण्यात आला. प्रगतशील शेतकरी विनायक महाजन, प्रल्हाद महाजन, विजय महाजन यांचा परिवार, रावेर येथील कांतीलाल बुवा आदी भक्तगण प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. रावेर येथील कपील दुबे, दिनेश शर्मा व निरूळ येथील रमाकांत सोहनी महाराज यांनी पौरोहित्य केले.
कोरोनाच्या सोशल डिस्टन्सिंगमध्ये सूर्यकन्या तापीमाईला खणा नारळाची ओटी केली समर्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 6:05 PM
सूर्यकन्या तापामाईचा जन्मोत्सव सोहळा शनिवारी भावभक्तीने साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देकृतज्ञता : अजनाड येथे खान्देशच्या सीमारंभी जीवनवाहिनीच्या जन्मोत्सव सोहळ्याला अखंड १८ वर्षांची परंपरासोशल डिस्टन्सिंगचे पालन