यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, विस्तार अधिकारी के.एन. माळी, सरपंच मोहन राणा भिल्ल, उपसरपंच अर्चना पाटील, ग्रामसेवक एस. के. तेली, सदस्य रमेश पांगारे, छगन पाटील, समाधान रावते, शेखर निकम, ग्रामस्थ अतुल पाटील, भैय्यासाहेब रणदिवे, बळवंत जाधव, पुंजाराम पाटील, डाॅ.विजय जाधव, डाॅ.अरविंद पारख, बापू गायकवाड, विशाल पाटील, हेमराज सूर्यवंशी उपस्थित होते.
स्मार्ट ग्राम योजनेच्या पुरस्काराच्या रकमेतून जनहितासाठी रुग्णवाहिका खरेदी करून, देवळी ग्रामपंचायतीने लोककल्याणकारी काम करून जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला, असे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी गौरवोद्गार काढले. नागरिक वेगवेगळ्या आजारांना आज सामोरे जात आहेत. त्यांना तातडीने तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी आरोग्य सुविधा उपयुक्त, अशी रुग्णवाहिका आज प्रत्येक गावात असणे काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून देवळी ग्रामपंचायतीने रुग्णवाहिका खरेदी केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
===Photopath===
270621\27jal_1_27062021_12.jpg
===Caption===
रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी सभापती अजय पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, उपसभापती सुनिल पाटील, व ग्रामस्थ.