पाचोरा : पाचोरा नगर परिषदेतर्फे शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
मोठ्या शहरात जो विकास होऊ शकला नाही, तो पाचोरा शहरात झाला असून आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा शहराचा विकास साधला आहे. शहराच्या उर्वरित विकासासाठीही शासन सर्वतोपरी निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मंत्री एकनाथ शिंदे यांनी बापूसाहेब के.एम.पाटील व्यापारी संकुलाचे उद्घाटन करताना दिली.
प्रास्ताविकात आमदार किशोर पाटील यांनी शहरात ४४ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन, तर ४५ कोटींच्या कामांचे लोकार्पण झाल्याचे सांगितले.
यावेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली होती. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला भेट देऊन एकनाथ शिंदे यांनी डॉ. भूषण मगर आणि डॉ. स्वप्नील पाटील यांच्यासह पत्रकारांना सन्मानित केले.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार उदयसिंग राजपूत, विष्णू भंगाळे, गुलाबराव वाघ, हर्षल माने, संजय सावंत, शरद तायडे, नगराध्यक्ष संजय मुकुंद बिल्दीकर, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रवीण ब्राह्मणे आदी उपस्थित होते.