भुसावळ : शहरातील मुख्य बाजारपेठेतील मरिमाता चौकात मंगळवारी दुपारी तेरापंथी शीतलजल आरो प्लांटचे लोकार्पण नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या पुढाकाराने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पाणपोई असली तरी तिची काहीशी दुरवस्था झाल्याने नगरसेवक पिंटू कोठारी यांनी दखल घेत पाणपोईची डागडुजी केली तसेच अत्याधुनिक आर.ओ.प्लॉटची सुविधा उपलब्ध करून दिल्याने या परिसरातील नागरिक तसेच वाटसरूंची भर उन्हाळ्यात थंड पाण्यामुळे तृष्णा भागणार आहे. दिवसभरात साधारण सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान अंदाजे पाच हजार नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्याची या पाणपोईची क्षमता आहे. मोतीलाल लखीचंद निमाणी व सुजीत रमेशचंद्र कोठारी यांच्या स्मरणार्थ तेरापंथी शीतलजल प्याऊचे उद्घाटन रमेशचंद्र पूनमचंद कोठारी व कांचनबाई मोतीलाल निर्माणी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक निर्मल कोठारी, कविता कोठारी, अजित कोठारी, मंजू कोठारी व बाजार परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भुसावळात आरो प्लांट पाणपोईचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:08 PM