भुसावळ : रोटरी क्लब ऑफ रेलसिटीतर्फे समाजातील गरीब गरजू रुग्णांच्या सोईसाठी आर्थो बँकेची निर्मिती करण्यात आली आहे. या बँक अंतर्गत व्हिल चेअर- पाच नग, सेमी फौलर बेड- पाच नग, चार ऐअर बेड, चार वॉटर बेड, कमोड चेअर- चार नग असे रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध आहे. या आर्थो बँकेचा व्यवस्थित वापर व्हावा यासाठी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीकडे या आर्थो बँकेचे लोकार्पण करण्यात आले. हे साहित्य २४ तास मोफत गरजू रुग्णांसाठी गुरुद्वारा भुसावळ येथे उपलब्ध राहील.भुसावळ मिल्ट्रि स्टेशनचे कमांडर कर्नल करुण ओहोरी यांच्या हस्ते, गुरुद्वारा प्रबंधक कमिटीप्रमुख बलदेवसिंग पल्ला यांना बँकेचे लोकार्पण करण्यात आले.यानिमित्त आयोजित कार्यक्रमास डॉ.नीलेश महाजन, रोटरी प्रांतपाल शब्बीर शकीर, माजी प्रांतपाल राजीव शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रोटरी रेलसिटीच्या या समाजोपयोगी ऊपक्रमाचे कौतुक केले. याचा फायदा निश्चितपणे समाजाच्या तळागाळातील गरजूंकरिता होईल, असा विश्वास व्यक्त केला.उपक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शहा, प्रकल्पप्रमुख अनिल सहानी, सहप्रकल्प प्रमुख हरविंदरसिंग थेटी व सर्व रोटरी रेलसिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
भुसावळात रोटरी रेलसिटीद्वारा आर्थो बँकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 2:12 PM