चाळीसगाव : बुद्ध पौर्णिमेच्या पर्वणीवर महात्मा फुले जन आरोग्य शासकीय रुग्णालयात तालुका बौद्ध पंचायतीच्या वतीने मल्टी पॅरा मॉनिटर या वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. यावेळी पाच संच दिले गेले.
यावेळी माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, आमदार मंगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, टाकळी प्र. चाळीसगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच व पत्रकार किसनराव जोर्वेकर, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, डॉ. मंदार करंबेळकर, आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना योद्ध्यांचा गौरव सन्मानपत्रे देऊन करण्यात आला. यात तालुका कोविड नोडल अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर, वर्धमान धाडीवाल, दिलीप घोरपडे, लक्ष्मण शिरसाठ, पंकज पाटील, मुराद पटेल, सदानंद चौधरी, आदींचा समावेश आहे. बौद्ध पंचायतचे सरचिटणीस व संयोजक धर्मभूषण बागुल यांनी सूत्रसंचालन केले. बौद्ध पंचायतीचे पदाधिकारी प्रभाकर जाधव, नगरसेवक रामचंद्र जाधव, गौतम झाल्टे, महेश चव्हाण, गौतम जाधव, ॲड. राहुल जाधव, किरण जाधव, स्वप्निल जाधव यांच्या हस्ते अतिथींचा सत्कार करण्यात आला. बौद्धाचार्य भय्यासाहेब ब्राम्हणे यांनी बुद्धवंदना करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
यशस्वीतेसाठी संजय केदार, विष्णू जाधव, प्रदीप चौधरी, रणजित गव्हाळे, कारभारी केदार, प्रकाश सोनवणे, आनंद ढिवरे, विजय जाधव, शरद जाधव, संजय सोनवणे, आदींनी सहकार्य केले.
===Photopath===
260521\26jal_4_26052021_12.jpg
===Caption===
चाळीसगावी वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण