जळगाव : पाळधी, ता. धरणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्स आणि लोक सहभागातून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील होते. पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी या कामाचा आढावा घेत निर्देश दिले होते. यानंतर नुकतेच याचे लोकार्पण गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, प्रांताधिकारी गोसावी, तहसीलदार देवरे, संभाजी चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी सोनवणे, संजय पाटील, सचिन पवार, प्रकाश पाटील, धनराज कासट क्लब अध्यक्ष उपस्थित होते.
कोविड केअर सेंटरमध्ये २५ ऑक्सिजन बेड
पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरमध्ये ३० जनरल बेड असून यासोबत येथे २५ ऑक्सिजन बेड आणि पाच मिनी व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा परिसरातील कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी उपयोग होणार आहे.
जळगाव येथील डॉ. सुशील गुजर, डॉ. महेंद्र मल, डॉ.अपर्णा मकासरे, डॉ. पराग पवार हे या कोविड सेंटरमध्ये सेवा देणार असून गरज भासल्यास ३० बेडवरून १०० बेडची व्यवस्था करणार असल्याचे जि.प. सदस्य प्रताप पाटील यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार सागर मुंदडा यांनी केले.