जळगाव : श्रीराम मंदिर संस्थानच्या शेवटच्या रासक्रीडा वहनाच्याा निमित्त बळीराम पेठेत दिवाळीच साजरी करण्यात आली. वहनाच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या़ ठिकठिकाणी या वहनाचे भाविकांनी स्वागत केले़बळीराम पेठेत पंडित काळे यांच्याकडे, रथचौकात दीपक तरूण मंडळ व शनीपेठेत श्री दत्त मंदिर देवस्थान या ठिकाणी पान सुपारीचा कार्यक्रम झाला़मंगेश महाराज यांच्या उपस्थिती सायंकाळी सहा वाजता श्रीराम मंदिरापासून वहन मार्गस्थ झाले़ यावेळी रथोत्सव समितीचे प्रभाकर पाटील यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती़२९ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या वहनोत्सवाचा समारोप शनिवारी श्री रासक्रीडेच्या वहनाने झाला. सायंकाळी ६ वाजता वहन वाजत गाजत श्रीराम मंदिरापासून निघाले. भोईटे गल्ली, कोल्हेवाडा, आंबेडकर गल्ली, चौधरी वाडा, विठ्ठल मंदिर, तरूण कुढापा चौक, हिंगलाच माता मंदिर, रथ चौक, दीपक तरूण मंडळ येथे यानंतर बालाजी मंदिर, शनिमंदिरामार्गे शनिपेठेत श्री गुरूदत्त मंदिर येथे दुसरा पानसुपारीचा कार्यक्रम होऊन वहनाची आरती व स्वागत सोहळा झाला. ठिकठिकाणी वहनावर फुलांचा वर्षाव करण्यात आला़ रांगोळ्यांनी रस्ते सजविले होते़ कंदिलांनी घराघरात सजावट करण्यात आली होती़ विठ्ठलाची आकर्षक रांगोळी अधिकच लक्षवेधी ठरली़ घराघरांवर आकर्षक रोषणाई व आकाशकंदिल, दाराशी पणत्या लावण्यात आल्याहोत्या.जणू आज दिवाळीच असल्याची प्रचिती या ठिकाणी होती.या भागात वहन येताच फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. विविध ठिकाणी पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले़ या वहनामुळे भक्तगणांमध्ये एकच उत्साह संचारला असल्याचे दिसून येत होते.
फुुनकं मिरवणुकीच्या स्वागतासाठी बळीराम पेठेत दीपावलीची प्रचिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 5:54 PM