कालिंका माता परिसरातील एका महिलेने एका स्मॉल फायनान्स कंपनीकडून ३ हजार ७०२ रुपये कर्ज घेतले होते. त्याची देय रक्कम ५ हजार ८४ रुपये इतके झाले. कर्ज फेडण्याची मुदत होऊन वर सहा दिवस झाले. या कर्जाचे हप्ते थकल्याचे कारण देत फायनान्स कंपनीने थकबाकीदार महिलेच्या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. ग्रुप प्रोफाईलला महिलेचा फोटो लावण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, त्या महिलेल्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या सर्व नंबर या ग्रुपमध्ये अॅड करण्यात आली. ग्रुपमध्ये विना परवानगी अॅड केलेल्या यातील एका महिलेच्या पतीने ग्रुप अॅडमीनला फोन करून याबाबत जाब विचारला असता, त्याने सांगितले की, संबंधित महिलेने तुमचा नंबर ओळख म्हणून दिला असेल?. किंवा त्या महिलेच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल. सबंधित फायनान्स कंपनीचा माणूस थकबाकीदार महिलेला वारंवार चोर म्हणून संबोधित करत होता. हे सगळं बेकायदेशीर आहे, याची जाणीव करुन दिली असता आमची हीच पद्धत असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, समाजात अशा पद्धतीने बदनामी झाल्याने नैराशातून विपरित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कर्ज थकविले म्हणून चोर संबोधून महिलेचे सोशल मीडियावर बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:14 AM