शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

सैन्यात भरती झालेल्या युवकांना धरणगावात मिरवणुुकीने निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:58 PM

लष्करात भरती झालेल्या युवकांना मिरवणुकीद्वारे निरोप देण्यात आला.

ठळक मुद्देमातृभूमीच्या रक्षणार्थ युवकांना प्रोत्साहनजियो तो देश के लिये, और मरो तो देश के लिय

धरणगाव, जि.जळगाव : नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे युवकांमध्ये देशभक्ती संचारली असून, ‘जियो तो देश के लिये, और मरो तो देश के लिये’ असा नारा ग्रामीण भागातील युवक देताना दिसत आहे. याचाच प्रत्यय येथे आला. लष्करात भरती झालेल्या युवकांना मिरवणुकीद्वारे निरोप देण्यात आला.नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या सैन्य भरतीत जी.डी.पदावर येथील एकुलता एक असलेला पारस रवींद्र महाजन (मोठा माळी वाडा, धरणगाव), विशाल संजय पाटील (भोणे), राकेश मराठेसह तालुक्यातील सात युवक भरती झाले. त्यांना प्रशिक्षणासाठी कर्नाटक (बेळगाव) येथे मराठा बटालीयनमध्ये हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या युवकांच्या मित्र परिवारासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मिरवणुकीने त्यांची विदाई केली.याप्रसंगी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे सामाजिक कार्यकते गुलाब मराठे माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, सामाजिक कार्यकर्ते शरदकुमार बन्सी आदींनी सत्कार करुन लष्करात भरती झालेल्या या युवकांना शुभेच्छा दिल्या.देशसेवेसाठी एकुलत्या एक मुलाला लष्करात भरती करून पाठविल्याबद्दल पारसचे वडील तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र महाजन यांचाही सत्कार यावेळी माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, गुलाब मराठे यांनी केला. यावेळी उपस्थित युवकांनी बसस्थानकावर ‘भारत माता की जय’चा जयघोष केला.