पहूर, ता. जामनेर: येथील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच पदाधिकाऱ्यांसह पहूर येथील उपविभागीय विज वितरण कार्यालयात विजेच्या समस्यांचे निवेदन घेऊन धडकले. पण कार्यालय बंद व अधिकारी निवेदन स्विकारण्यासाठी नसल्याने पदाधिकारी संतप्त झाले. आणि चक्क बंद कार्यालयाला तसेच अधिकाºयाच्या खूर्चीला पुष्पहार अर्पण केला आणि समस्या आठ दिवसांत न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.याबाबत वृत्त असे की, पहूर येथील विज वितरण उपविभागीय कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयात पाळधीचे सरपंच सोपान सोनवणे, उपसरपंच संदिप सुशिर, माजी सरपंच कमलाकर पाटील पदाधिकाऱ्यांसह विजेच्या समस्यांचे निवेदन देण्यासाठी धडकले, पण अकरा वाजून ही कार्यालय बंद,तसेच उपकार्यकारी अभियंता उपस्थित नाही. यामुळे उपस्थित पदाधिकारी संतप्त झाले आणि कनिष्ठ अभियंता यांच्या बंद कार्यालयाला व उपकार्यकारी अभियंता यांच्या खूर्चीला पुष्पहार अर्पण करून संताप व्यक्त करीत लिपिक नरेंद्र पांढरे यांना निवेदन दिले. यावेळी उमेश धनगर, पप्पू पाटील, सुनील ठाकरे, अक्षय गायकवाड, हर्षल पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्वर वाघ आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.विविध समस्यावारंवार विजेचा लंपडाव, नाईकी नाल्यावरील विज पुरवठा खंडित, शेती फिडरचा ट्रान्सफॉर्मर बंद, गावासाठी कायमस्वरूपी लाईनमन नाही, पीरबाबा जवळील ट्रान्सफॉर्मर आहे खराब आदी समस्या निवेदनात नमूद केल्या असून यापूर्वीही लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत पण याकडे जाणीव पूर्वक दूर्लक्ष केल्याचा आरोप कमलाकर पाटील यांनी केला आहे.मी बाधित असल्याने क्वारंटाईन असून सुटीवर आहे. त्यामुळे कार्यालयात आलो नाही. माझे कार्यालय सुरु आहे.-विद्याधर सोनवणे, उपकार्यकारी अभियंता, विजवितरण कार्यालय, पहूर
पहूर येथील बंद वीज वितरण कार्यालयाला घातला हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 10:33 PM