साऱ्या संतांच्या मांदियाळीने देवाच्या स्वरूपाचा परिचय करून घेतला आणि देव मिळवला. कोणत्याही गोष्टीचा परिचय पूर्णपणे झाल्याशिवाय त्या गोष्टीची आपल्याला पूर्ण जाणीव होत नाही. कधी- कधी वाणीवरून परिचय होतो. चालण्या बोलण्यावरून परिचय होतो. पण हा वरवरचा परिचय.काही लोक कुंभमेळ्याला गेले. तिथे भगव्या कपड्यातील चार साधू बसलेले दिसले. त्यांच्याशी परिचय करून घेऊ, म्हणून लोक त्यांच्यातील पहिल्या साधुकडे गेले आणि त्याला विचारले की, महात्माजी आम्ही संसारात त्रस्त झालो आहोत, आम्हाला यातून सोडवण्यासाठी मार्गदर्शन करा. साधू म्हणाला ‘राम नाम लड्डू’! गोपाळ नाम घी! हरी नाम मिश्री! घोर घोर पी! लोकांना वाटलं की सर्व खाद्यपदार्थ विषयी सांगतोय, म्हणजे हा साधू ब्राम्हण असावा. त्यानंतर दुसºया साधूकडे गेले आणि त्यालाही विचारले तर तो म्हणाला ‘राम नाम का खड्ग बनाया !कृष्ण नाम की कट्यार!हरी नाम की ढाल बनाके! यम का फंदा कात लिया!’ त्याने शस्त्रांचा विचार सांगितला याचा अर्थ हा क्षत्रिय असला पाहिजे.तिसºया साधू कडे गेले, तो म्हणाला यह संसार सब हट्ट है! ज्या को जेसो कर्म ! टोळी दियो सामान! हा व्यापार विषयी बोलतो म्हणजे हा साधू वैश्य असला पाहिजे. चौथ्या साधूकडे गेले, तो म्हणाला... राम नाम झरोखे बैठ कर! कृष्ण नाम की मुजरा ले! या वरून हा साधू क्षुद्र कुळातील असला पाहिजे. असा अंदाज त्यांनी लावला.याचा अर्थ वाणी वरून सुध्दा परिचय होतो.संत तुकाराम महाराज यांनी एका अभंगात भगवंताचा परिचय दिला आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी! कर कटेवरी ठेवोनिया! यात भगवंताचा स्थूल किंवा तटस्थ किंवा रूपाचा परिचय करून दिला आहे तर शेवटच्या चरणात भगवंताचा स्वरूपाचा परिचय करून दिला आहे. हा सूक्ष्म किंवा स्वरूपाचा परिचय झाल्याशिवाय देव म्हणजे सुख आपल्याला मिळणार नाही. म्हणजेच अहं ब्रम्हस्मी या विचारावर आल्याशिवाय देव कळणार नाही आणि देवच अनुभवला नाही तर सुख कधी अनुभवता येईल. म्हणून जाणोनी नेणोनी अंगा आली दशा! मग होय ईच्छा आपणच! या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे संसारातून नेणते झाल्याशिवाय देवाची म्हणजे सुखाची जाणीव होणार नाही.नामदेव महाराज म्हणतात देह जावो अथवा राहो ! पांडुरंगा दृढ भाव! या जाणीव वर ठाम राहून आनंदी जीवन जगता येते, हा संतांचा अनुभव प्रत्यक्षात उतरवण्याच्या प्रयत्न करावा हीच खरी जीवनाची इती कर्तव्यता.े. त्यासाठी विठ्ठल आमुचे जीवन!आगम निगम चे स्थान! विठ्ठल सिद्धीचे साधन! विठ्ठल ध्यान विसावा!- भाऊराव महाराज, मुक्ताईनगर.
देह जावो ...अथवा राहो...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 7:20 PM