ऑनलाई लोकमत/अजय पाटील
जळगाव, दि.10- सात-आठ वर्षाचा होतो, तेव्हा उन्हाळा सुरु झाला की आई-वडिल मामाच्या किंवा नातेवाईकांच्या गावाला आमची रवानगी करून देत असत, कारण उन्हाळ्याचे चार महिने म्हटले की देव्हारीवासीयांसाठी पाण्याकरीता भटकंतीचा काळ. मुलांचे या काळात हाल होवू नये म्हणून गावातील प्रत्येक घरात हीच स्थिती होती. आज मी 23 वर्षाचा झालो तरी गावात हीच स्थिती कायम आहे. उन्हाळा आला की बायाबापडय़ांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. ना शासन लक्ष देते ना लोकप्रतिनिधी. आम्ही ग्रामस्थांनी आता काय करायचे? असा उद्वीगA सवाल देव्हारी गावातील नितीन बि:हाळे या युवकाने ‘लोकमत’प्रतिनिधीकडे उपस्थित केला.
जळगाव शहरापासून 15 किलो मीटर अंतरावर व वाघूर धरणापासून फक्त दोन कि.मी. अंतरावर असलेल्या देव्हारीगावाची बिकट अवस्था आहे. धरणाच्या काठावर असतानाही पाणीपुरवठय़ाची योजना नसल्याने ग्रामस्थ वर्षानुवर्षे तहानलेलेच आहेत. मात्र गावाची मतदारसंख्या अगदी कमी असल्याने लोकप्रतिनिधींनी गावाकडे सपशेल पाठ फिरवली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासूनच टंचाईच्या झळा
550 लोकवस्ती असलेल्या देव्हारी ग्रामस्थांची गेल्या 15 वर्षापासून पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. परिसरात पाण्याचे स्त्रोत कमी असल्याने ग्रामस्थांची फेब्रुवारी महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती सुरु होत असते. फेब्रुवारी ते जुलै महिन्यादरम्यान ग्रामस्थांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत असतात. दरवर्षी हीच स्थिती. लोकप्रतिनीधी, अधिका:यांकडे अनेकदा व्यथा मांडल्या, मात्र नाईलाज झाला. गावात टंचाई कायम आहे.
दिवसाला दोन टॅँकर
देव्हारी व उमाळा दोन गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. पर्जन्यमान चांगले असले तर देव्हारी गावात साधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात टॅँकरने पाणीपुरवठा सुरु होत असतो. पर्जन्यमानात घट झाली तर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच गावात टॅँकरने पाणीपुरवठा होतो. यंदा पर्जन्यमान चांगले असल्याने फेब्रुवारी र्पयत परिसरातील विहिरी व कुपनलिकांमध्ये पाणी होते. मात्र मार्च महिन्याच्या दुस:या आठवडय़ापासून पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे 6 एप्रिलपासून गावात सकाळी दोन टॅँकर येतात व त्याव्दारे गावाला पाणीपुरवठा होत असल्याचे देव्हारी ग्रामस्थांनी सांगितले.
शासकीय कार्यालयांचे उंबरठे ङिाजविल्यानंतर सुरु झाले टँकर
मार्च महिन्यात पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे ग्रामस्थांनी गावात टॅँकर सुरु करण्यात यावा यासाठी गटविकास अधिका:यांकडे प्रस्ताव पाठविला. मात्र प्रस्ताव पाठवून देखील टॅँकर सुरु होत नसल्याने ग्रामस्थांना उमाळा गावातून व देव्हारीच्या शिवारात 3 ते 4 कि.मी.पायपीट करून पाणी आणावे लागत होते. ग्रामस्थांनी पंचायत समिती, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे ङिाजविल्यानंतर 15 दिवसांनी गावात टॅँकर सुरु झाल्याची माहिती सखाराम पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.