जळगाव/धुळे/नंदुरबार : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर तीनही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी आचारसंहिता अंमलबजावणीची यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. विविध अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या यासाठी करण्यात आली असून आचारसंहिता भंग करणाºयांवर गुन्हे दाखल केले जावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.४८ फिरती पथके ठेवणार लक्षजळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी ४८ फिरत्या पथकांसह तालुक्याच्या ठिकाणी आचारसंहिता अंमलबजावणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.जिल्ह्यातील १५ तालुक्यात प्रत्येकी तीन फिरती पथके असतील. केवळ जळगाव शहर व ग्रामीण साठी वेगवगेळे तीन पथके असतील. यात पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार किंवा बीडीओसह पथक प्रमुख व अन्य कर्मचारी असे पाच जणांचे एक पथक असेल. ४८ पथकांमध्ये अधिकारी कर्मचारी मिळून २५० जण असतील.बैठी पथके प्रत्येक तालुक्यालायासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील क्षेत्रात आचारसंहिता अंमलबजावणी कक्ष असेल. जवळपास २५० कर्मचारी जिल्हाभरात असतील. यासह आयकर, बॅँक अधिकारी आर्थिक परिस्थितीच्या पडताळणीसाठी असतील व ते सादर माहितीची तपासणी करतील.धुळे जिल्ह्यासाठी २४ अधिकारी नियुक्तधुळे लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर लगेचच त्या वेळेपासून आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू झाला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड हे या कक्षाचे प्रमुख असून त्याअंतर्गत मनपा, नपा, गृह, महसूल, पंचायत समिती, पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क अशा विविध विभाग व खात्यांचे २४ अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असलेले पथक स्थापन करण्यात आले आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी व तिचे पालन काटेकोरपणे होत आहे का? हे पाहणे या पथकाचे प्रमुख काम आहे.नंदुरबारला कक्ष स्थापननंदुरबार येथे लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली असून अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. या ठिकाणी आवश्यक त्या सर्व यंत्रणा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्याच कार्यालयात हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाअंतर्गत विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आचारसंहिता अंमलबजावणीसाठी पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:26 AM
जळगाव जिल्ह्यात ४८ फिरती पथके
ठळक मुद्दे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना