जळगाव : प्रसुतीसाठी गर्भवती महिलेला जिल्हा रुग्णालयात आणत असतानाच रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनातच महिला प्रसुत झाली, मात्र बाळाचा पोटातच मृत्यू झाला होता. रविवारी दुपारी ही घटना घडली. प्रतिभा विनोद गायकवाड (१९, रा.पाथरी, ता.जळगाव) असे महिलेचे नाव आहे. तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रतिभा यांना प्रसुती कळा असह्य होत असल्याने कुटुंबाने तातडीने खासगी वाहनातून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले.वाहन रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येताच कळा अधिक जाणवू लागल्या हा प्रकार समजल्यानंतर डॉ. अर्चना निकुंभ तसेच डॉ. निकिता भागवनकर यांनी वाहनाजवळ धाव घेतली.पंधरा मिनिटानंतर वाहनातच ती प्रसूती झाली, मात्र बाळ मृत झालेले होते. महिलेला वाचविण्यात यश आले, मात्र बाळाला वाचविता आले नाही.दरम्यान, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने बाळ मृतावस्थेत जन्मल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. महिलेस उपचारार्थ प्रसूती कक्षात दाखल करण्यात आले आहे.
जळगावात ‘सिव्हील’ प्रवेशद्वारातच महिलेची प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:04 PM