जळगाव : लॉकडाऊनच्या काळात अनेक गरीब आणि गरजूंना शिवभोजनाचा आधार मिळत असून जिल्ह्यात वाढता प्रतिसाद पाहता जिल्ह्यासाठी आणखी वाढीव एक हजार ५०० शिवभोजन थाळींची मागणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून दररोज ३५०० थाळींचे वितरण होत आहे.थाळीची किंमत निम्म्यावरज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये तर ही योजना जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि निराश्रित यांच्यासाठी वरदान ठरत आहे. त्यात या काळात अनेकांच्या हाताला काम नसल्याने शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपये केली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे.दिवसेंदिवस वाढती मागणीगेल्या पाच ते सहा महिन्यांपासून या योजनेला जिल्ह्यात वाढता प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला जळगाव शहरातील ९ केंद्र्रासह व मुक्ताईनगर तालुक्यातील एका केंद्रावर जवळपास ९२५ थाळी रोज नागरिकांना वाटप केल्या जात होत्या. त्यानंतर त्यात वाढ होत जाऊन अन्य तालुक्यांमध्येदेखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे सध्या जळगाव शहरातील १६ केंद्रांसह जिल्ह्यातील ३८ शिवभोजन केंद्रांवरून दररोज ३५०० थाळ््यांचे वितरण केले जात आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली.मागणी आणखी वाढविलीया योजनेला वाढता प्रतिसाद पाहता आता पुन्हा वाढीव १५०० थाळ््यांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. तसे पत्र देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात ३८ शिवभोजन केंद्र्राच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यात ४ लाख ९२ हजार ३४८ नागरिकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला.पार्सल स्वरुपात वाटपकोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याने शिवभोजन थाळीचे स्वरूप बदलून पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये पार्सल स्वरूपात तयार जेवण दिले जात आहे. या शिवभोजन थाळीचा वितरण करताना फोटो काढण्यात येतो. प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र अॅपवरदेखील अपलोड केले जात आहे. एक वाटी वरण, एक वाटी भात, दोन पोळ््या आणि एक वाटी भाजी असे शिवभोजन योजनेचे स्वरूप आहे.दोन केंद्र चालकांना ताकीदशिवभोजन केंद्रांवरून वितरण होणाºया या पार्सल स्वरुपातील थाळीमध्ये देण्यात येणाºया पोळ््या व भाताचे ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कमी वजन भरल्याचे आढळून आले होते. यामध्ये संबंधितांना ताकीद देण्यात आली.
जळगाव जिल्ह्यासाठी १५०० वाढीव शिवभोजन थाळींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 11:35 PM