पेरणीसाठी घरगुती बियाणे वापरा
जळगाव : सोयाबीन बियाणांचा भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरगुती सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
लसीकरणासाठी केंद्र वाढवा
जळगाव : राज्यभरात सर्वत्र कोरोनाची स्थिती गंभीर होत असून या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांसह लसीकरण केंद्र वाढवावे, अशी मागणी आरपीआय (खरात गट) यांच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, ठेकेदार पद्धतीचे कर्मचारी वाढवावे, तसेच १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार असल्याने राज्यातील शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांना स्वतंत्र लसीकरणाचे अधिकार देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष जे.डी. भालेराव, सचिव प्रवीण परदेशी, सिद्धार्थ गव्हाणे आदी उपस्थित होते.