चाळीसगाव मार्गावर शिवशाही सुरू करण्याची मागणी
जळगाव : जळगाव आगारातर्फे सध्या पुणे, नाशिक, औरंगाबाद मार्गावरच शिवशाही बससेवा सुरू आहे. मात्र, चाळीसगाव मार्गावर शिवशाही बससेवा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी आगार प्रशासनाने जळगाव आगारातून नियमित चाळीसगाव मार्गावर शिवशाही बससेवा सुरू
करण्याची मागणी होत आहे.
वाहकांना मोफत सॅनिटाईजर व मास्क पुरविण्याची मागणी
जळगाव : आगार प्रशासनातर्फे फक्त सुरुवातीला कोरोनाच्या काळात चालक-वाहकांना मोफत सॅनिटाईजर व मास्क पुरविण्यात आले. मात्र,आता कर्मचाऱ्यांना स्वत: पैसे खर्च करुन सॅनिटाईजर व मास्क खरेदी करावे लागत आहे. तरी मनपा
आगार प्रशासनाने वाहकांना व चालकांना मोफत सॅनिटाईजर व मास्क पुरविण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.
कोरोना लस देण्याची मागणी
जळगाव : महामंडळातील चालक-वाहक व इतर प्रशासकीय विभागातील कर्मचारी सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असतानाही नियमित कर्तव्यावर येत आहेत. विशेष म्हणजे चालक-वाहकांचा दररोज हजारो प्रवाशांशी संपर्क येत आहे. तरी राज्य शासनाने महामंडळातील चालक-वाहकांना कोरोना लस देण्याची मागणी इंटक संघटनेतर्फे राज्य शासनाकडे केली असल्याची माहिती इंटकचे सचिव नरेंद्रसिंह राजपूत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा रुग्णालयासमोर पुन्हा अतिक्रमण थाटले
जळगाव : जिल्हा रुग्णालयासमोर विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांवर मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर, या रस्ता मोकळा झाला होता. मात्र, मनपाची कारवाई थंडावल्यानंतर, पुन्हा या ठिकाणी रस्त्यालगत खाद्य पदार्थ व्यावसायिकांची दुकाने थाटली आहेत. यामुळे वाहतुकीला दररोज अडथळा निर्माण होत आहे.