शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

नगरसेवकांच्या वकीलांनी मागितली मुदत

By admin | Published: February 23, 2017 12:53 AM

घरकुल नुकसान प्रकरण : २३ मार्चला होणार पुढील सुनावणी

जळगाव : खंडपीठाच्या आदेशानुसार घरकुल घोटाळा व मोफत बस सेवा योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आजी-माजी नगरसेवकांकडून मनपाचे झालेले नुकसान वसुली करण्याबाबतच्या सुनावणीला बुधवारी सुरवात झाली़ यात १२ आजी-माजी नगरसेवकांना बोलाविण्यात आले होते़ खुलासे व बाजू मांडण्यासाठी मुदत मिळावी, यासाठी त्यांच्या वतीने वकीलांनी वेळ मागितली़ त्यानुसार मुदत देण्यात आली असून २२ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे़घरकुल व मोफत बस सेवा योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आजी-माजी ४८ नगरसेवकांकडून घरकुलची सुमारे १ कोटी १६ लाखाची आणि मोफत बससेवेची ४८ नगरसेवकांकडून ५ लाख १४ हजार वसुली करण्याबाबत आयुक्तांनी सुनावणी घ्यावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार घरकुल घोटाळ्यातील आजी माजी नगरसेवकांच्या सुनावणीच्या पहिल्या दिवशी १२ आजी- माजी नगरसेवकांची सुनावणीसाठी बोलाविण्यात आले होते़ आयुक्त जीवन सोनवणे यांच्या दालनात सकाळी १०  ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुनावणीची प्रक्रिया चालली. सर्व नगरसेवकांचे वकीलपत्र अ‍ॅड. डी. एच. परांजपे यांनी घेतले. याप्रकरणात खुलासा तसेच आपली बाजू मांडण्यासाठी वकीलांनी २२ मार्चपर्यंतचा मुदत मागितली. त्यानुसार आयुक्तांनी २२ मार्चला बाजू मांडण्याची अनुमती दिली आहे. याप्रसंगी लेखा परीक्षक डी.आर. पाटील, लेखा परीक्षण विभागाचे अनिल बिºहाडे, रवींद्र कदम आदी उपस्थित होते.आजी-माजी नगरसेवक हजरअफजल खान रऊफ खान पटवे, शिवचरण ढंढोरे, अशोक काशिनाथ सपकाळे, मंजुळा धर्मेंद्र कदम, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, डिंगबर दौलत वाणी, पुष्पा प्रकाश पाटील, देविदास धांडे, शांताराम सपकाळे, इकबालोद्दीन जीयोद्दीन पिरजादे हे स्वत: हजर होते. यात प्रदिप रायसोनी व महेंद्र तंगू सपकाळे हे गैरहजर होते़ रायसोनी यांच्यातर्फे गोंविद वानखेडे तर सपकाळे यांच्यातर्फे अ‍ॅड. डी. एच. परांजपे हे उपस्थित होते. आज या आजी माजी नगरसेवकांची सुनावणीघरकुल घोटाळा नुकसान भरपाईप्रकरणी १६ रोजी सुभद्राबाई सुरेश नाईक, वासुदेव परशुराम सोनवणे, अलका अरविंद राणे, विजय रामदास वाणी, चंद्रकांत उर्फ आबा शंकर कापसे, विद्यमान आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, सरस्वती रामदास कोळी, चुडामण शंकर पाटील, अजय राम जाधव, अशोक रामदास परदेशी, कैलास  सोनवणे, डिगंबर पाटील यांना सुनावणीची नोटीस आहे. त्रयस्त अर्जदारही मांडणार म्हणणेसुनावणीदरम्यान म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, यासाठी त्रयस्त अर्जदार दिपककुमार गुप्ता यांनी आयुक्तांना परवानगीसाठी अर्ज दिला होता़ तो अर्ज आयुक्तांना मंजूर केला आहे़ २२ मार्च रोजी सुनावणीदरम्यान त्रयस्त अर्जदारही उपस्थित राहणार असून त्याला आपले म्हणणे मांडता येणार आहे़वकीलांनी सुनावणीवर घेतला आक्षेपसर्व आजी-माजी नगरसेवकांचे वकीलपत्र अ‍ॅड़ डी़एच़परांजपे यांनी घेतले आहे़ त्यानुसार बुधवारी अ‍ॅड़परांजपे यांनी सुनावणीचे घेण्याचे विभागीय आयुक्तांनाच अधिकार असल्याचे सांगत सुनावणीवर आक्षेप घेतला़ मात्र आयुक्तांनी खंडपीठाचे आदेश असल्याचे अ‍ॅड़ परांजपे यांना स्पष्ट केले़