फोटो आहे..
इंधन बचत पंधरवडा
जळगाव : देश विकासासाठी इंधन बचत करणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी असून गॅस ,पेट्रोल ,डिझेल वापर कमीत कमी करून करता येईल हे कटाक्षाने जीवनात पाळणे महत्त्वाचे आहे, असे मत नगरसेवक सचिन पाटील यांनी व्यक्त केले. इंधन बचत पंधरवडानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद बागूल होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा नेमाडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार शेखर भंगाळे यांनी मांनले. कार्यक्रमास चंद्रशेखर देसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मैथिली नेमाडे, पल्लवी भंगाळे, वर्षा ढाके
यांनी स्वागत केले.
रक्तदान शिबिर
जळगाव - रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जिजाऊ ब्रिगेडतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. नगरसवेक नितीन बरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील मोढे, डॉ. कांचन नारखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिजाऊ ब्रिगेडचे शहराध्यक्ष सुचिता पाटील, कांचन पाटील, सीमा पाटील, मनीषा पाटील, राजश्री पाटील, मीनाक्षी पाटील, ज्योती पाटील, मराठा सेवा संघाचे राम पवार, सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, दिनेश पाटील, श्याम पाटील, खुशाल पाटील आदींनी परिश्रम घेतले.