बसस्थानकासमोरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
जळगाव : नवीन बसस्थानकासमोर विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या लागल्यामुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीही होत आहे. तरी मनपा प्रशासनाने येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
शिवशाही बसेस सुरू करण्याची मागणी
जळगाव : सध्या बस सेवा सुरू असली तरी, धुळे, चाळीसगाव, पुणे या मार्गावर दिवस साध्या लालपरी बसेसच चालिण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने या मार्गावर वातानुकूलित शिवशाही बसेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
रेल्वेतर्फे स्टेशनकडे जाणारा दुसरा मार्गही खुला
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला लागूनच असलेला एकच रस्ता खुला केला होता. यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नुकताच स्टेशनकडे जाणारा दुसरा मार्गही खुला केला आहे.