जळगाव : कोरोनाच्या काळात शासनाने चर्मकार समाजातील गटई कामगारांना देखील १५ हजार रुपये अनुदान तातडीने द्यावे, तसेच बाबू जगजीवनराम यांच्या नावाने चर्मकार आयोग स्थापन करावा, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघाने काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांना दिले आहे.
काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे या शनिवारी जळगावला आल्या होत्या. त्यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले की, कोरोनाच्या काळात शासनाने गटई कामगारांना आर्थिक मदत द्यावी, तसेच चर्मकार आयोगाची स्थापना करावी, अनुसूचित जात पडताळणी समितीकडील प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी, संत रविदास महामंडळाची कर्ज मर्यादा वाढवावी, महाविकास आघाडीत चर्मकार समाजाला मंत्रीपद मिळावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, उत्तम मोरे, चेतन तायडे, गिरीश भारुडे, अर्जुन भारुडे, विजय घुले, उमेश सोनवणे, सुनील विसावे, गणेश घुले, ज्ञानेश्वर बाविस्कर उपस्थित होते.