एकीकडे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आणि दुसरीकडे शासन आणि अधिकारी यांच्या केवळ वेळकाढूपणामुळे तारादूत सारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प आज रखडलेले आहेत म्हणून महाराष्ट्रातील तारादूतांनी आतापर्यंत तीन वेळेस आंदोलन केले आणि सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे तारादूत पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे शेतात किंवा घरी बसून उपोषण करण्याचा निर्णय तारादूतांनी घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तारादूत घरी बसून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहेत. गेल्या पंधरा महिन्यांपासून सारथी संस्थेच्या चौकशीमुळे सारथी संस्थेमधील सर्वच प्रकल्प बंद केले आहेत. त्यामुळे तारादूतांना अकरा महिन्याच्या नियुक्त्या द्याव्यात अन्यथा कोविड संपल्यानंतर तारादूत आणि मराठा संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचे उपोषणकर्ते तारादूत सुनील देवरे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तारादूत प्रकल्पावरील स्थगिती उठविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:12 AM