कोरोनापासून बचाव करण्यासाठी ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. आता दुसरा डोस घेणे आवश्यक असताना कोठेही मुबलक प्रमाणात लस उपलब्ध नाही. अनेक नागरिक लसीसाठी वणवण फिरत असून अनेक ठिकाणी मोठ्या रांगा लागत आहे. ज्या ठिकाणी काही प्रमाणात लस उपलब्ध आहे, तेथे मोठी गर्दी होते.
यात आता १८ वर्षांवरील व्यक्तींना डोस देण्याचे राज्य सरकारने जाहीर केलेले आहे. त्यामुळे पुढे आणखी गर्दी वाढू शकते. सद्य:परिस्थितीत कोरोना लागण खूप वाढत आहे. त्यास रोखणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी व पुढील गर्दी कमी करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर राज्य कॅट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शाह, रामजी सूर्यवंशी, सुभाष कासट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.