प्रभाग क्रमांक ३ गोंधळवाडा, बडामोहल्ला, येथे अगोदर पहाटे ४ वाजता पाणी सोडत होते. आता वेळ बदलून सायंकाळी ५ वाजता सोडण्यात येत आहे. या भागातील रहिवासी मोलमजुरी करणारे आहेत. सायंकाळी ५ वाजता त्यांना पाणी घेणे शक्य नाही. सायंकाळी वीजपुरवठा अनेक वेळा बंद राहत असल्यामुळे त्यांना पाणी मिळत नाही. म्हणून त्यांना पहाटे ४ वाजता सोडण्यात यावे, तसेच जमिनीतील लोखंडी पाण्याच्या पाइपची १० ते १५ इंच साइज वाढवून जमिनीत टाकण्यात यावा व जास्त दाबाने पाणी मिळावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन नगरपालिकेच्या कार्यालयीन अधीक्षिका संघमित्रा संदानशिव यांना देण्यात आले.
निवेदनावर काँग्रेसचे शहराध्यक्ष भिकन भाऊराव अहिरे, सत्तार रज्जाक नईमाबी, शेख तोलम मोमीन, अब्दुल सत्तर अब्दुल रज्जाक, मोहम्मद यासीन अब्दुल रज्जाक, अकील अहमद शेख मुसा, मोहम्मद आसिफ शेख मुसा, समिनाबी मोहसीन, नसीमबी शेख रहीम, आनंद गुलाब महाजन, खलील अहमद शमशोद्दीन यांच्यासह शेकडो नागरिकांच्या सह्या होत्या.