आरटीपीसीआर चाचण्या वाढविल्या
जळगाव : एकूण चाचण्यांपैकी ७० टक्के आरटीपीसीआर व ३० टक्के अँटिजन चाचण्या असाव्यात असे शासनाने आदेश दिले असल्यामुळे आता अँटिजन चाचण्याचे प्रमाण कमी करून आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण जिल्ह्यात वाढविण्यात आले आहेत. यात नियमित साडेतीन हजारांवर आरटीपीसीआर होत असून, चार ते पाच हजारांपर्यंत अँटिजन चाचण्या होत आहेत.
श्वानदंशाचे प्रमाण वाढले
जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, गेल्या काही दिवसांत लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना वाढल्या आहे. दिवसाला अशा २५ ते ३० जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येत आहे. या ठिकाणी इंजेक्शन देऊन प्राथमिक उपचार केले जातात, तर गंभीर रुग्णांना मात्र डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पाठविण्यात येते.