लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा महानगर भाजप ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडीने नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना निवेदन दिले. त्यात स्कुल व्हॅन आणि ऑटो रिक्षा चालक यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची मागणी केली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी, सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, भाजप महानगर स्कुल व्हॅन आघाडी उपाध्यक्ष संदीप वाणी, दिलीप वाघ, सुनिल चौधरी, राजेश माळी, दीपक माळी, गणेश माळी, मिलिंद अहिरे, दिनेश भावसार, प्रकाश बडगुजर, वसंत झुंजारराव, नाना वाणी, सुनिल वाणी, सुनिल चौधरी, दीपक माळी उपस्थित होते. यात चालक- मालक यांना १० हजार रुपये अनुदान द्यावे, शाळा सुरू होत नाही तोपर्यंत बस स्टॉप वरून ५० किमी अंतरापर्यंत चालवण्याची परवानगी द्यावी, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ मिळावी व त्यावरील व्याज माफ करावे, रिक्षाची मर्यादा २० वर्षे करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.