जामनेर : शाडूमातीच्या मूर्तीना गणेशभक्तांकडून पुन्हा मागणी होत आहे. येथील मूर्तिकार श्रीराम तुकाराम कुंभार यांनी बनविलेल्या मूर्तींना नंदुरबार, भुसावळ, जळगाव येथून मागणी होत आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा शाडूमातीच्या मूर्तींकडे कल वाढत असल्याचे कुंभार यांनी सांगितले.
तुकाराम मोरे (कुंभार) हे जुने मूर्तीकार असून त्यांच्या मूर्तींना जिल्ह्याबाहेर मोठी मागणी असते. यंदादेखील गेल्यावर्षाप्रमाणेच निर्बंध पाळून गणेशोत्सव साजरा होत असल्याने सार्वजनिक मंडळांकडून साधेपणाने उत्सव साजरा केला जाणार आहे.
घरगुती गणेशमूर्तींना यंदा चांगली मागणी आहे. शाडू मातीच्या किमतीत वाढ झाल्याने मूर्तींच्या किमती वाढल्याचे कुंभार यांनी सांगितले. कुटुंबातील मुलगा, मुलगी व नातवंडे मूर्तीकामात मदत करतात, असे त्यांनी सांगितले.