कोरोनाबाबत महामंडळातर्फे जनजागृती
जळगाव : शहरात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्यामुळे, जळगाव आगार प्रशासनातर्फे प्रवाशांमध्ये मास्कचा वापर, सॅनिटाईझरचा वापर, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच मास्क असणाऱ्या प्रवाशानाच बसमध्ये प्रवेश देण्याबाबत चालक-वाहकांना सांगण्यात येत आहे.
आगारात कॉक्रिटीकरणाचे काम अपूर्णच
जळगाव : जळगाव आगार प्रशासनातर्फे बस स्थानकातील रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्यामुळे कॉक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, प्रशासनातर्फे क्रॉक्रिटीकरण न करता फक्त बारीक खडी टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कॉक्रिटीकरणाचे काम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे काम पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
बसेसच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका
जळगाव : जळगाव आगाराच्या एमएच २० बीएल ०७६४ या बसचा मागील दरवाजा तुटला असल्याने, आगार प्रशासनाने याठिकाणी लोखंडी पत्रे लावून, दरवाजाची जागा बंद केली आहे. मात्र,हे पत्रे व्यवस्थित न लावल्यामुळे, या पत्र्याचा पादचाऱ्याला धक्का बसून, अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी आगार प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.
सुर्योदय मंडळातर्फे ऑनलाईन कथाकथन
जळगाव : सुर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे अठराव्या वर्धापन दिनानिमित्त १३ मार्च रोजी ऑनलाईन कथाकथनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध लेखिका प्रा.विजया मारोतकर (नागपूर) यांचे दुपारी ४ वाजता ऑनलाईन कथाकथन होणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सतिश जैन यांनी केले आहे.