ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 2 - गेल्या 35 वर्षापासून रहिवास असला तरी प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या समतागनर परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. या वेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. समाज समता मंडळाच्यावतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखील हा मोर्चा काढण्यात आला. समतानगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्य़ापासून या मोर्चास सुरुवात झाली. मोर्चादरम्यान मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा पोहचल्यानंतर तेथे त्याचे सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी अनिल अडकमोल यांनी मार्गदर्शन केले तसेच रहिवाशांनी आपल्या व्यथा मांडल्या. यानंतर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. यामध्ये जागेचा 7/12 उतारा मिळावा, मुद्रा योजनेच कर्ज मिळावे, रस्त्याची दुरुस्ती करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या.