शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

कॉग्रेसच्या काळात देश मागणारा, मोदींच्या काळात देणारा; राहुल लोणीकर यांची टीका

By सुनील पाटील | Published: June 25, 2023 1:09 PM

४१ लाख तरुणांना मुद्राचे कर्ज

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : कॉग्रेस पक्ष सत्तेत असताना देशाला दुसऱ्याकडे हात पसरवावे लागत होते, आता मोदींच्या काळात देश देणारा आहे. सुदैवाने आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मोदी नसते आणि काँग्रेसचा पंतप्रधान राहिला असता तर आजही आपल्याला सार्वजनिक स्वरूपात फिरता आले नसते अशी टिका भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर यांनी केली. राज्यात ४१ लाख बेरोजगार तरुणांना मुद्रा कर्ज वितरीत करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने राबविलेल्या उपक्रम व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी लोणीकर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी ते जळगावात आले असता भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवास साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री योगेश मैध, नगरसेवक विशाल त्रिपाठी उपस्थित होते.

कोरोना काळात संपूर्ण जगावर संकट कोसळले होते. त्या काळात मोदींनी भारतात लस निर्माण केली. जगाच्या पाठीवर फक्त पाच देश कोविडची लस निर्माण करणारे देश होते. त्यात आपला भारत देश एक आहे. जगातल्या जवळपास ४० देशांना लस पुरविण्याचे काम भारताने केले. नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वामुळे हे शक्य झाल्याचंही राहूल लोणीकर यांनी सांगितले. काँग्रेसच्या काळात आपण मागणारे होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत देणाऱ्यांच्या भूमिकेत आला आहे.

बेरोजगारी, कापसाच्या भावावर मौन

देशात व राज्यात भाजप सत्तेत असल्याने शासकीय योजनेच्या माध्यमातून अनेकांना त्याचा लाभ मिळवून दिला. मोठे उद्योग आणले. अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्याची माहिती दिली. बेरोजगारी,महागाईच्या मुद्यासह २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी मोदी प्रचारार्थ जळगावात आले असता तुम्ही एक खासदार गुजरातला दिला आहे, आता आणखी दोन खासदार निवडून द्या, तुम्हाला जळगावातच कापसावर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी टेक्सटाईल्स पार्क उभारु असे आश्वासन मोदींनी दिले होते, आता २०२४ निवडणूक आली. आश्वासन तसेच कापसाला भाव मिळत नाही या प्रश्नावर मात्र लोणीकर यांनी मौन बाळगत आमदार सुरेश भोळे यांच्याकडे बोट दाखविले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव