आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.३१ : बीएचआर पतसंस्थेत राज्यभरातील ठेवीदारांच्या सुमारे ९ हजार कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. त्या परत मिळण्याच्यादृष्टीने राज्य ठेवीदार संघर्ष समितीतर्फे गुरूवार, ३१ मे रोजी सकाळी महात्मा गांधी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होेते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर तसेच बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी शिष्टमंडळाशी सुमारे २ तास चर्चा करून सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती समितीने दिली. तसेच या मागण्यांच्या अंमलबजावणीवर देखरेखीसाठी राज्यस्तरावर समितीची स्थापनाही करण्यात आली.राज्य ठेवीदार संघर्ष समितीतर्फे गुरूवार, ३१ मे रोजी सकाळी महात्मा गांधी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होेते. सकाळी ११ वाजता मोर्चास प्रारंभ झाला. त्यात मोठ्या संख्येने ठेवीदार सहभागी झाले होते. सुमारे ११.४५ च्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे ठेवीदार समितीच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. तसेच धरणे आंदोलन करण्यात आले.
जळगावात बीएचआर पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मागण्या मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:08 PM
बीएचआर पतसंस्थेत राज्यभरातील ठेवीदारांच्या सुमारे ९ हजार कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. त्या परत मिळण्याच्यादृष्टीने राज्य ठेवीदार संघर्ष समितीतर्फे गुरूवार, ३१ मे रोजी सकाळी महात्मा गांधी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होेते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी व अवसायकांशी झाली चर्चाराज्यभरातील ९ हजार कोटींच्या ठेवी पडूनदेखरेखीसाठी राज्यस्तरावर समितीची स्थापना