चाळीसगाव, जि.जळगाव : दिव्यांग मुलांना फिजिओथेरपी, ओक्युपेशनल थेपरी दिली तर त्यांच्या हालचालींमध्ये गतिमानता आणता येते. त्यांनी नियमित व्यायाम केल्याने त्यांच्या शारीरिक क्षमता वाढवता येऊ शकतात, असे मत चाळीसगाव येथील नालंदा विद्यालयात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या थेरपी शिबिरात जळगाव येथील फिजिओथेरपिस्ट डॉ.अपेक्षा शिरसाठ यांनी मांडले. शिबिर शुक्रवारी पार पडले.समग्र शिक्षा अभियान, पंचायत समिती शिक्षण विभाग, समावेशित शिक्षण उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारची शिबिरे तालुकास्तरावर आयोजित केल्या जातात. थेरपी शिबिराच्या माध्यमातून विविध व्यायाम प्रकार दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमक्ष शिकविण्यात आले. त्यासोबत पालकांचे समुपदेशनही करण्यात आले.या थेरपी शिबिराला डॉ.अपेक्षा शिरसाठ, डॉ.वृषाली वारणकर, सुवर्णा चव्हाण यांनी तपासणी करून विविध व्यायाम प्रकार शिकविले. तसेच प्रत्यक्ष थेरपी दिली.मतिमंद, वाचादोष, बहुविकलांग, सेरेब्रल पालसी, अस्थिव्यंग प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा या शिबिरात समावेश होता. तब्बल तालुक्यातील ४५ विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. दिवसभर चाललेल्या या शिबिराचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी केले.शिबिर यशस्वीतेसाठी समावेशित तज्ज्ञ पंकज रणदिवे, श्यामकांत नेरकर, विशेष शिक्षक प्रशांत पाटील व रवींद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.
चाळीसगावला दिव्यांग थेरपी शिबिरात विविध व्यायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 3:09 PM
दिव्यांग मुलांना फिजिओथेरपी, ओक्युपेशनल थेपरी दिली तर त्यांच्या हालचालींमध्ये गतिमानता आणता येते. त्यांनी नियमित व्यायाम केल्याने त्यांच्या शारीरिक क्षमता वाढवता येऊ शकतात, असे मत चाळीसगाव येथील नालंदा विद्यालयात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या थेरपी शिबिरात जळगाव येथील फिजिओथेरपिस्ट डॉ.अपेक्षा शिरसाठ यांनी मांडले.
ठळक मुद्दे४५ दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभडॉ.अपेक्षा शिरसाठ यांनी केले मार्गदर्शन