शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

चाळीसगाव पालिकेत भुयारी गटार योजनेचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 5:42 PM

प्रोजेक्टरवर सादरीकरण : नगरसेवकांची उपस्थिती

चाळीसगाव, जि.जळगाव : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियांतर्गत प्रस्तावित असलेल्या भुयारी गटार योजनेचे प्रात्यक्षिक प्रोजेक्टरवर शुक्रवारी सकाळी ११ वाजता पालिकेच्या सभागृहात सादर करण्यात आले. या वेळी सत्ताधारी गटातील सर्व तर विरोधी गटातील दोनच सदस्य उपस्थित होते.शहरात अंतर्गत जलवाहिनी योजनेसाठी शासनाने ७१ कोटी १५ लाख ९० हजार ७५२ रुपये खर्चाची योजना मंजूर केली असून, योजनेची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर दरडोई १३५ लीटर पाणी देणे शक्य होणार आहे. त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे. भुयारी गटार योजना यासाठीच असल्याचे प्रात्यक्षिकादरम्यान सांगण्यात आले.शहरात एकूण १७ प्रभाग आहेत. २०११च्या जनगणनेनुसार ९५ हजार ५५१ इतकी लोकसंख्या तर एक हजार ८५९ हेक्टर क्षेत्रफळ आहे. सद्य:स्थितीत उघड्या गटारीतून सांडपाणी व घाण वाहते.भुयारी गटारीसाठी पुढील ३० वर्षांची लोकसंख्या गृहीत धरुन २०५०पर्यंतची मलनि:स्सारण व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेत १३५ लीटर दरडोई पाणीपुरवठा करण्यास मान्यता मिळाली आहे. घरगुतीसह शैक्षणिक, वैद्यकीय, व्यावसायिक व इतर संस्थांची मलनि:स्सारण सांडपाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. योजनेतच मलनि:स्सारण शुद्धीकरण केंद्रही उभारले जाईल.या वेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, संजय रतनसिंग पाटील, चंद्रकांत तायडे, अरुण अहिरे, नितीन पाटील, विजया प्रकाश पवार, चिराग शेख, विजया भिकन पवार, रंजना सोनवणे, संगीता गवळी आदी उपस्थित होते.योजनेच्या प्रात्यक्षिक सादरीकरणाविषयी सर्व नगरसेवक सदस्यांना लेखी पत्राव्दारे सूचित केले होते, अशी माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाChalisgaonचाळीसगाव